esakal | कृष्णा बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर विस्तारणार: अतुल भोसले
sakal

बोलून बातमी शोधा

Bank

बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बँकेच्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

"कृष्णा बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर विस्तारणार"

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): सेवा आणि व्यवसाय वृद्धीसाठी कृष्णा सहकारी बँकेने राज्यभर शाखा विस्तार करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बँकेच्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या उपस्थितीत सभा ऑनलाइन झाली. उपाध्यक्ष दामाजी मोरे, संचालक शिवाजीराव थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे, संचालक दयानंद पाटील, श्रीरंग देसाई, जे. डी. मोरे, बाबासाहेब शिंदे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, बाजीराव निकम, विलास भंडारे, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब निकम उपस्थित होते.

हेही वाचा: कऱ्हाड : विवाहितेच्या खूनप्रकरणी आणखी एकजण ताब्यात

अध्यक्ष अतुल भोसले म्हणाले, ‘‘कोरोनामुळे बँकिंग क्षेत्रासमोरही आव्हाने निर्माण झाली. त्या काळातही सर्व नियमांचे पालन करून बँक सुस्थितीत आहे. मागील आर्थिक वर्षात ६५० कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला. २०२०- २१ मध्ये बँकेचा एकूण व्यवसाय ९६ कोटींने वाढला आहे. या वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये ८२६७ .९४ लाख इतकी वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२१ अखेर बँकेच्या ठेवी ४३५७६.१९ लाख इतक्या आहेत. सलग नऊ वर्षे बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के आहे. येत्या आर्थिक वर्षात बँकेने ८५० कोटींचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.’’

डॉ. भोसले म्हणाले, ‘‘बँकिंगमध्ये होणारे बदल स्वीकारून व तंत्रज्ञानाचा वापर करत प्रगती सुरू आहे. सर्व नव्या गोष्टींचा अवलंब करत कृष्णा बँक पुढे वाटचाल करत आहे.’’

loading image
go to top