
वाघ है रे, वाघ है.. अतुलबाबा वाघ है!
कऱ्हाड (जि. सातारा) : वाघ है रे वाघ अतुल बाबा वाघ है... नाद नाय करयाचा अतुल बाबांचा अशा घाेषणा देत युवा वर्ग आज (गुरुवार) कृष्णा रुग्णालय आणि वैद्यक महाविद्यालय व संशाेधन केंद्र परिसरात गुलाल उधळत हाेते. युवकांच्या हातात सहकार पॅनेलचे झेंडे हाेते. हा उत्साह हाेता युवा नेते डॉ. अतुल सुरेश भोसले यांच्या जयवंतराव भोसले यांचे सहकार पॅनेलने कृष्णा साखर कारखान्यातील निवडणुकीच्या मतमाेजणीतील पहिल्या फेरीत घेतलेल्या निर्णाय आघाडीचा. (krishna-sugar-factory-election-2021-youth-celebrations-atul-bhosale-krushna-hospital)
यशवंतराव मोहिते कृष्णा साखऱ कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाची मोजणी आज (गुरुवार) सकाळ पासुन येथील वखार महामंडळाच्या गोदामात सुरु झाली. सकाळच्या पहिल्या टप्यात इतर मागास प्रवर्ग व भटक्या जाती जमाती प्रवर्गातील मतांची पाच हजारांच्यावर आघाडी गेल्यावर सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा चॅरीटेबल ट्रस्टवर जल्लोष करण्यास प्रारंभ केला.
हेही वाचा: Krishna Election Result Live : काेणाला किती मते मिळाली पाहा
सहकार पॅनेलचे गावोगावचे कार्यकर्ते ट्रस्ट परिसरात जमा झाले. दुपारी दाेननंतर त्यात वाढ होत गेली. गावोगावच्या कार्यकर्त्यांनी गुलालाच्या उधळणीत केलेल्या घोषणाबाजीने तो परिसर दणाणुन गेला.
हेही वाचा: सर्वांनी जबाबदारीने वागा : उदयनराजे