esakal | कुटुंबांच्या भवितव्याबाबत काळजी घेवूया, राजकारण नंतर पाहू; साै. माेहित्यांची मंत्री पाटलांच्या भेटीत चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant patil & savita mohite

'कुटुंबांच्या भवितव्याबाबत काळजी घेवूया, राजकारण नंतर पाहू'

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांची डॉ. सविता इंद्रजीत मोहिते यांनी रविवारी इस्लामपूर (islampur) येथे सदिच्छा भेट घेतली. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या (krishna sugar factory election) पार्श्वभूमीवर ती भेट महत्त्वाची ठरली आहे. (krishna-sugar-factory-election-jayant-patil-indrajeet-mohite-savita-mohite-satara-marathi-news)

भेटीत डॉ. मोहिते यांनी मंत्री पाटील यांना कारखान्याच्या सभासद व कामगारांच्या कुटुंबांचा विचार करूया, राजकारणाचे नंतर पाहू, अशी विनंती केली. डॉ. मोहिते व मंत्री पाटील यांच्यात तासभर चर्चा झाली. कोरोनास्थिती (corona pandemic) , लॉकडाउनवरही (lockdown) चर्चा करताना डॉ. मोहिते यांनी मंत्री पाटील यांना "कृष्णा'च्या 40 हजार सभासद व तीन हजार कामगारांच्या भवितव्याबाबत काळजी घेवूया, राजकारण नंतर पाहू, अशी विनंती केली. यावेळी मंत्री पाटील यांनी डॉ. मोहिते यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगितल्याचे डॉ. मोहिते यांनी स्पष्ट केले. डॉ. मोहिते या इंद्रजीत माेहितेंच्या पत्नी आहेत. माेहिते हे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. "कृष्णा'च्या निवडणुकीसाठी अद्याप राष्ट्रवादी काॅंग्रेस अथवा त्यांच्या नेत्यांनी काेणतीच भुमिका घेतलेली नाही. डाॅ. माेहितेंनी मंत्री पाटील यांची घेतलेली भेटच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरत आहे.

हेही वाचा: हॉटेल्स, रेस्टॉरंट, सलूनसह साता-यात दुकाने उद्यापासून अनलाॅक

कृष्णा कारखान्यासाठी 213 उमेदवार पात्र

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठीच्या 213 अधिकृत पात्र उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नुकतीच जाहीर केली. छाननीत 22 अर्ज बाद झाले. राहिलेल्या 213 उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी आज जाहीर केली. उद्यापासून 17 जूनअखेर अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर 18 जूनला चिन्हा वाटप आहे.

गटनिहाय जाहीर अधिकृत उमेदवारांची नावे अशी

रेठरे बुद्रुक- शेणोली गट ः डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले, आदित्य मोहिते, अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, जयेश मोहिते, नूतन मोहिते, महेश कुलकर्णी, (सर्व रा. रेठरे बुद्रुक), अधिकराव निकम, पांडुरंग निकम, बाजीराव निकम, मारुती निकम, बाबूराव पाटील-निकम, अशोक पाटील, दीपक पाटील, सुनील सावंत (सर्व रा. शेरे). संतोष जाधव, बापूसाहेब पाटील (रा. रेठरे खुर्द), संपत कणसे (रा. शेणोली).

रेठरे हरणाक्ष- बोरगाव गट ः पोपट कदम, मोहन जाधव, अनिल पाटील, छाया पाटील (सर्व रा. कामेरी ता. वाळवा), संतोष दमामे, संभाजी दमामे, सयाजीराव पाटील, हणमंत पाटील, मीनाक्षीदेवी दमामे, लव्हाजीराव देशमुख (सर्व रा. बहे, ता. वाळवा), भरत कदम (रा. भवानीनगर, ता. वाळवा), महेश पवार, जयवंत मोरे, दामाजी मोरे, विश्वासराव मोरे-पाटील, विवेकानंद मोरे, केदारनाथ मोरे, सुभाष शिंदे (सर्व रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा), शिवाजी पवार, संजय पाटील, युवराज पाटील, संदीप पाटील (सर्व रा. उरुण- इस्लामपूर), जगन्नाथ पाटील, जितेंद्र पाटील, मानाजी पाटील, विश्वास पाटील, उदयसिंह शिंदे, प्रमोद शिंदे (सर्व रा. बोरगाव, ता. वाळवा), जयकर शिंदे (रा. इस्लामपूर).

Krishna Sahakari Sugar Factory

Krishna Sahakari Sugar Factory

वडगाव हवेली - दुशेरे गट ः बापूसाहेब मोरे, अशोक जगताप, आनंदा जगताप, कृष्णा जगताप, तुकाराम जगताप, प्रतापसिंह जगताप, बाळासाहेब जगताप, विशाल पाटील, संभाजी मोरे (सर्व रा. कोडोली), भागवत कणसे (रा. विंग), जयवंत गरुड, सुभाष गरुड (रा. येणके), राजेंद्र चव्हाण, विठ्ठल पाटील (दोघे रा. कोळे), अशोक मारुती जगताप, काकासाहेब जगताप, जगदीश जगताप, सुधीर जगताप, सुहास जगताप (सर्व रा. वडगाव हवेली), शिवाजी जगताप (रा. जुळेवाडी), धोंडीराम जाधव, बाबूराव जाधव, सुदाम जाधव (तिघे रा. दुशेरे), आत्माराम देसाई, किसन देसाई, श्रीरंग देसाई (तिघे रा. आणे), संदीप पवार (रा. चचेगाव). विलास पाटील, सुभाष पाटील, कृष्णराव यादव, सयाजी यादव, सर्जेराव लोकरे, सुभाष लोकरे (रा. येरवळे).

काले-कार्वे गट ः अमित पाटील, पोपटराव जाधव, रमेश जाधव, राजेश जाधव, विठ्ठलराव जाधव, संजय जाधव, उदयसिंह पाटील, गुणवंतराव पाटील, प्रमोद पाटील, बाळासाहेब पाटील, विजयसिंह पाटील, सयाजीराव पाटील (सर्व रा. आटके), अमरसिंह थोरात, दत्तात्रय थोरात, दिग्विजय थोरात, निवासराव थोरात, सुजित थोरात, संतोष पाटील, संदीप पाटील (सर्व रा. कार्वे), अजित पाटील, चंद्रकांत पाटील, दयाराम पाटील, नानासाहेब पाटील, पांडुरंग पाटील, पारस पाटील (सर्व रा. काले), नरेंद्र पाटील, नरेंद्र पाटील-नांगरे (जखीणवाडी).

हेही वाचा: 'सामान्य जनतेने निवडणुक हातात घेतल्याने आम्हीच जिंकू'

नेर्ले-तांबवे गट ः दिनकर ऊर्फ सुखदेव गावडे (रा. कासेगाव, ता. वाळवा), राहुल चव्हाण (रा. वाटेगाव ता. वाळवा), विक्रम चव्हाण, द्वारकोजी पाटील, गणेश पाटील, लिंबाजी पाटील, अशोक मोरे (सर्व रा. तांबवे, ता. वाळवा), अनिल जगताप (रा. येवलेवाडी, ता. वाळवा), धनंजय थोरात, भिकू थोरात, मनोहर थोरात (सर्व रा. कालवडे), दत्तात्रय देसाई, संभाजी पाटील, सुरेश ऊर्फ सुभाष पाटील (तिघे रा. वाठार), प्रदीप पाटील (रा. कापूसखेड, ता. वाळवा), प्रशांत पाटील, मनोज पाटील, वसंत पाटील, विलासराव पाटील, विश्वास पाटील, संभाजीराव पाटील, सुभाष उद्धव पाटील (सर्व रा. नेर्ले, ता. वाळवा), जयवंत मोहिते, मारुती मोहिते (दोघे रा. बेलवडे बुद्रुक).

येडेमच्छिंद्र-वांगी गट ः अशोक देशमुख, पांडुरंग मोहिते (दोघे रा. मोहित्यांचे वडगाव, ता. कडेगाव), रामचंद्र महाडिक (रा. चिंचणी-वांगी, ता. कडेगाव), राजाराम शिंदे, बापूसाहेब मोरे, माणिकराव मोरे, बाबासाहेब शिंदे (सर्व रा. देवराष्ट्र, ता. वाळवा), प्रतापराव पाटील, बाबासाहेब पाटील, भीमराव पाटील, शिवाजी पाटील, संजय पाटील, सुरेश पाटील (सर्व रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा).

हेही वाचा: बलाढ्य नेत्यांचे अर्ज ठरले अवैध; 'कृष्णा'च्या प्रचाराची रणनिती

महिला राखीव गट ः उज्ज्वला जगताप, कांचनमाला जगताप, शैलजा पाटील (सर्व रा. कोडोली). नंदाताई जगताप (रा. वडगाव हवेली). इंदुमती जाखले (रा. नेर्ले, ता. वाळवा), अश्विनी जाधव (रा. हिंगणगाव खुर्द, ता. कडेगाव). ललिता थोरात (रा. कालवडे), सत्त्वशीला थोरात, मीनाक्षादेवी दमामे, जयश्री पाटील, संगीता पाटील, सावित्री पाटील (सर्व रा. बहे, ता. वाळवा), उमा अजितकुमार देसाई (रा. काले), शुभांगी निकम, हेमलता निकम, उषा पाटील (रा. शेरे), क्रांती पाटील (रा. दुशेरे). मंगल पाटील (रा. नेर्ले, ता. वाळवा), सुरेखा पाटील (रा. शिरटे, ता. वाळवा), अर्चना मोहिते, नूतन मोहिते (रा. रेठरे बुद्रुक), किशोरी मोहिते (रा. बिचूद, ता. वाळवा), शोभा मोहिते (रा. बेलवडे बुद्रुक), अनुराधा लोकरे (रा. येरवळे), स्नेहल शिंदे (रा. बोरगाव, ता. वाळवा).

अनुसूचित जातीजमाती राखीव गट ः शिवाजीराव आवळे (रा. शिरटे, ता. वाळवा), धनाजी गोतपागर (रा. कोडोली). लालासाहेब घोडके, संजू बामणे (रा. कोरेगाव-कार्वे). नथुराम झिमरे, सहदेव झिमरे (रा. गोळेश्वर). भास्कर तडाखे, बाजीराव वाघमारे (रा. बेलवडे बुद्रुक). संभाजी पवार (रा. शेरे). दिलीप बनसोडे (रा. गोंदी). अधिकराव भंडारे, विलास भंडारे (दोघे रा. टेंभू). सुधीर रोकडे (रा. बहे, ता. वाळवा). शिवाजी लादे (रा. गोवारे). अनिल सावंत (रा. शेरे).

हेही वाचा: 'कृष्णा'त माेहित्यांच्या मनाेमिलनावर चर्चेचे गु-हाळ सुरुच

इतर मागास प्रवर्ग राखीव गट ः संजय कुंभार (रा. टेंभू). अमोल गुरव, संतोष दमामे, संभाजी दमामे (रा. बहे, ता. वाळवा). महादेव जंगम (रा. कोरेगाव-कार्वे). संजय जांभळे (रा. सदाशिवगड). मिलिंद पाटणकर (रा. कासारशिरंबे). कृष्णा माळी, महादू माळी, शंकरराव रणदिवे (तिघे रा. कासेगाव, ता. वाळवा). वसंतराव शिंदे (रा. विंग). प्रशांत श्रीखंडे (तांबवे, ता. वाळवा).

विमुक्त जाती - भटक्‍या जाती राखीव गट ः अमोल काकडे, रमेश काकडे, दिलीप गलांडे (रा. धोंडेवाडी). शंकर कारंडे (रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा). अविनाश खरात, नितीन खरात (दोघे रा. खरातवाडी, ता. वाळवा). गोविंद गावडे (रा. वाठार). जगन्नाथ गावडे (रा. रेठरे खुर्द). दिनकर ऊर्फ सुखदेव गावडे (रा. कासेगाव, ता. वाळवा). आनंदराव मलगुंडे (रा. इस्लामपूर). तात्यासाहेब लिंगरे (रा. टेंभू).

ब्लाॅग वाचा

loading image
go to top