हॉटेल्स, रेस्टॉरंट, सलूनसह साता-यात दुकाने उद्यापासून अनलाॅक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar Singh

हॉटेल्स, रेस्टॉरंट, सलूनसह साता-यात दुकाने उद्यापासून अनलाॅक

सातारा : राज्य शासनाच्या (maharashtra government) नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोना पॉझिटिव्हिटी रेट (covid 19 positivity rate) 10 ते 20 टक्‍क्‍यांच्या दरम्यान व ऑक्‍सिजन बेडची (oxygen bed) संख्या 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असल्याने सातारा जिल्ह्याचा चौथ्या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यामुळे उद्या (ता.सात जून, साेमवारपासून) लॉकडाउन (lockdown) शिथिल होऊन किराणा दुकानांसह (grocery shops) अन्य काही विशिष्ट गाेष्टींना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान पुढील आदेश येईपर्यंत सातारा जिल्ह्यात केवळ शनिवार आणि रविवारी पुर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वैध कारणाशिवाय नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. (shekhar-sinh-issues-guideline-break-the-chain-satara-breaking-news)

जिल्हाधिकारी कार्यालयाने आज (रविवार) काढलेल्या नव्या आदेशानूसार सातारा जिल्ह्यांत साेमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी पाच ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी असणार आहे. याबराेबरच किराण दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेत, पंक्चर दुकान, डेअरी, बेकी कन्फेक्शनरी, मटण, चिकन, अंडी, मासे दुकाने, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थींची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी 2 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबराेबरच मेडिकल दुकानांची वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत ठेवण्यात आली आहेत. यापुर्वी त्याची वेळ सायंकाळी सात पर्यंत करण्यात आली हाेती. रुग्णालयातील मेडिकलची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अत्यावशक नसलेली दुकाने पुर्णपणे बंद ठेवावीत असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

हेही वाचा: ..तर देशाचे तुकडे हाेण्यास वेळ लागणार नाही

नव्या आदेशानूसार शिवभाेजन थाळी सुरु ठेवता येईल. हॉटेल्स, रेस्टॉरंटमधून खाद्य पदार्थांची घरपोच सुविधा देता येईल. तसेच व्यायामासाठी सार्वजनिक जागा, खूल्या मैदानांवर सकाळी पाच ते सकाळी नऊ या वेळेत परवानगी असणार आहे; परंतु शनिवार व रविवारी व्यायामासाठी या ठिकाणांवर परवानगी नाकारण्यात आलेली आहे. क्रीडा स्पर्धांचे आयाेजन करु नये असेही आदेश नमूद करण्यात आले आहे.

लग्न समारंभासाठी 25 व्यक्तींच्या उपस्थितीत, तर अंत्यविधीसाठी 20 माणसांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. पक्ष, संघटनांच्या निवडणुकीच्या बैठका 50 टक्के उपस्थितीत घेता येणार आहेत.

हेही वाचा: सर्वांनी जबाबदारीने वागा : उदयनराजे

बांधकामाच्या साईटवर मुक्कामी कामगारांकडून कामे करुन घेता येणार आहे. शेतीच्या कामाशी संबंधित दुकाने दुपारी दाेन पर्यंत सुरु राहतील. जिम, व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा दुपारी दाेन पर्यंत चालू ठेवता येतील. त्यासाठी वेळ निश्‍चित करूनच ग्राहकांना बाेलावे अशा पद्धतीने परवानगी देण्यात आली आहे.

सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षमतेच्या 50 टक्‍क्‍यांच्या उपस्थितीत करता येईल. मालवाहतुकीस परवानगी असणार आहे. सर्व उद्योग 50 टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. याबराेबरच सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समिती सकाळी सात ते दुपारी दाेन पर्यंत सुरु राहणार.

सातारा जिल्ह्यातील लाॅजिंग सुविधा पुर्णतः बंद राहील. याबराेबरच वाईन शाॅप, परमिट रुम तसेच बार याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नव्या आदेशात नमूद केले आहे.

ब्लाॅग वाचा