esakal | कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक होणारच
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक होणारच

सातारा जिल्हा बॅंकेच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली. पण, कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुका 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक होणारच

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. पण, पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही. त्यामुळे शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावरून पुन्हा पाच महिने म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया मात्र सामाजिक अंतराच्या अटीचे पालन करून होणार आहे.
 
सहकाराच्या निवडणुका गेल्या वर्षापासून स्थगितीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. सुरवातीला मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या लॉकडाउनमुळे तीन महिने पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर 18 मार्च, 17 जून, 28 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यानंतर डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली गेली. त्यानंतर 16 मार्चच्या आदेशानुसार 31 मार्च 2021 पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्याने शासनाने 16 जानेवारीचा आदेश रद्द करून पुन्हा मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार सातारा जिल्हा बॅंकेच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली. पण, कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुका 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

सातारा जिल्ह्यात Covid 19 ची लस संपली! दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस लांबणीवर

विविध व्यापारी संघटना, त्यांचे प्रतिनिधी तसेच दुकानदारांची भावना आम्ही जाणून घेतली, काेण काय म्हणते वाचा सविस्तर

आता सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या आदेशातून सर्वोच्च व उच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे होणार आहेत, असे आदेश कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी काढले आहेत. त्यानुसार कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे.
 

हे बघा! उसाला पक्ष नसतो, सभासदांच्या हितासह निकोप सहकार कायम ठेवण्यासाठी मी निवडणूकीच्या रिंगणात 

Edited By : Siddharth Latkar

loading image