Kunbi caste certificate application requires genealogy proof and old official records; online facility available.
Sakal
सातारा
Kunbi Certificate: 'कुणबी दाखल्यांसाठी अशी हवीत कागदपत्रे'; ऑनलाइन सुविधा; वंशावळ, जुन्या नोंदीचा सरकारी दाखला गरजेचा, नेमकी काय प्रक्रिया..
Kunbi Caste Certificate: ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा करण्यात आली आहे. अर्जासोबत कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये कुणबी असल्याबाबतचा जुना सरकारी दाखला, वंशावळ, कुणबी नोंद असलेला शाळा सोडल्याचा दाखला, जमिनीशी संबंधित जुना उतारा या कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक आहे.
सातारा : राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता हे प्रमाणपत्र कसे काढायचे, असा प्रश्न सर्वसामान्य मराठा समाज बांधवांना पडला आहे. त्यासाठी शासन निर्णयात काही निकष दिले आहेत. ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा करण्यात आली आहे. अर्जासोबत कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये कुणबी असल्याबाबतचा जुना सरकारी दाखला, वंशावळ, कुणबी नोंद असलेला शाळा सोडल्याचा दाखला, जमिनीशी संबंधित जुना उतारा या कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक आहे.

