

Kundal Wrestling Mahakumbh
esakal
कुंडल : ऐतिहासिक आणि कुस्तीची वैभवशाली परंपरा लाभलेल्या कुंडलमध्ये रविवारी (ता. २७) लाल मातीतील कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. तब्बल शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या मैदानात यंदा भारतातील नामवंत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मल्ल एकमेकांशी भिडणार असल्याने कुस्तीशौकिनांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
यंदाच्या मैदानात महिला कुस्तीगीरांच्या लढतीही विशेष लक्षवेधी ठरणार आहेत. यात वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पियन खेळाडू रिंगणात उतरणार आहेत. या कुस्ती मैदानात पुरुष आणि महिला विभागांत अत्यंत चुरशीच्या व प्रेक्षणीय कुस्त्या जोडण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, भारत केसरी, आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक खेळाडूंचे थेट सामने पाहायला मिळणार आहेत.
महिला कुस्ती प्रतीक्षा बागडी (महाराष्ट्र केसरी, सांगली) विरुद्ध रीतिका हुडा (ऑलिम्पियन व वर्ल्ड चॅम्पियन, हरियाणा) सई भेलके (राष्ट्रीय पदक विजेती, बानगे) विरुद्ध बिपाशा दहिया (वर्ल्ड चॅम्पियन, सोनीपत) प्रेरणा पाटील (राष्ट्रीय पदक विजेती, देवराष्ट्रे) विरुद्ध सृष्टी भोसले (शिवछत्रपती पुरस्कार विजेती, कोल्हापूर) रिया भोसले (महाराष्ट्र चॅम्पियन, मुंबई) विरुद्ध आश्लेषा बागडे (आंतरराष्ट्रीय पैलवान, इंदापूर) कुस्तीच्या महासंग्रामाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील कुस्तीशौकीन आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांनी दिली. लाड म्हणाले, ‘मैदानात यंदा एकूण २३० कुस्त्या निश्चित करण्यात आल्या आहेत. समितीने निश्चित केलेल्या कुस्त्यांव्यतिरिक्त ऐनवेळी अन्य कोणत्याही मल्लाची कुस्ती लावली जाणार नाही. तसेच मैदानाची सायंकाळी सात वाजताच सांगता होणार आहे.’
मैदानातील प्रमुख पुरुष कुस्त्या सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) विरुद्ध दिनेश गोलिया (हिंदकेसरी, हरियाणा) हर्षद सदगीर (डबल महाराष्ट्र केसरी, पुणे) विरुद्ध राजू रायवाल (भारत केसरी, पंजाब) पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र केसरी, दिल्ली) विरुद्ध शुभम रायवाल (नॅशनल मेडलिस्ट, पंजाब) पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी, पुणे) विरुद्ध लल्लू जम्मू (जम्मू केसरी, जम्मू) दादा शेळके (महाराष्ट्र केसरी, पुणे) विरुद्ध साहिल कोहाली (भारत केसरी, अमृतसर) माऊली कोकाटे (उपमहाराष्ट्र केसरी, पुणे) विरुद्ध हदी इराण (आंतरराष्ट्रीय पैलवान, पंजाब) शुभम सिदनाले (शिवगर्जना केसरी, पुणे) विरुद्ध चीनू रायवाल (पंजाब केसरी, पंजाब) सुदर्शन कोतकर (राष्ट्रीय पदक विजेता, पुणे) विरुद्ध वैभव माने (महाराष्ट्र चॅम्पियन, पुणे) सनी मदने (महाराष्ट्र चॅम्पियन, कुंडल) विरुद्ध गोगी पंजाब (पंजाब) सतपाल शिंदे (महाराष्ट्र चॅम्पियन, पुणे) विरुद्ध मलंग कुमार (दिल्ली) सुबोध पाटील (महाराष्ट्र चॅम्पियन, पुणे) विरुद्ध महारुद्र काळेल (महाराष्ट्र चॅम्पियन, कुर्डूवाडी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.