Koregaon : जमिनीचा वाद टोकाला; जाधव कुटुंबावर पिता-पुत्राकडून कोयत्यानं सपासप वार, नाकाचं हाड फॅक्चर

श्रीकांत यांनी माझ्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करू लागले होते.
Crime News
Crime Newsesakal
Summary

श्रीकांत जाधव यांनी ट्रॅक्टरमधून उतरून कोयत्याने मला आणि माझ्या वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत नाकाचे हाड फॅक्चर झाले असून, डोक्यात व डाव्या हाताला मुका मार लागला आहे.

कोरेगाव : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथे काल सायंकाळी जमिनीत ट्रॅक्टर घालण्याच्या वादातून (Land Dispute) एका पिता-पुत्राने एक युवती आणि तिच्या वडिलांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर कोयत्याने वार करून, तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुलीच्या अंगावर ट्रॅक्टर (Tractor) घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

याबाबत अस्मिता ऊर्फ अबोली विकास जाधव (वय १९, रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) यांनी दिलेल्या जबाबानुसार येथील पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. जबाबात अस्मिताने म्हटले आहे, की काल सायंकाळी सहाच्या सुमारास भोसे रोडवरील शेतात श्रीकांत दत्तात्रय जाधव (रा. चिमणगाव) हे ट्रॅक्टर घालत असताना मी ‘तुम्ही आमच्या शेतात ट्रॅक्टर का घालताय, ट्रॅक्टर शेतात नेऊ नका,’ असे म्हटले असता श्रीकांत यांनी मला शिवीगाळ, दमदाटी केली आणि त्यांचे वडील दत्तात्रय गणपत जाधव (रा. चिमणगाव) यांनी तेथे येऊन मला ढकलले.

Crime News
Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा गळा दाबून केला खून; दगडानं ठेचला चेहरा अन् ओढणीनं..

श्रीकांत यांनी माझ्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करू लागले होते. मी घरच्यांना हाक मारून बोलविले असताना माझे चुलत आजोबा पृथ्वीराज बापूराव जाधव, आजी कमल, वडील विकास, आई सीमा आणि बहीण गायत्री आले असता दत्तात्रय जाधव यांनी आजोबा, आजी, वडील आणि मला दांडक्याने मारहाण केल्याने आम्ही सर्वजण जखमी झालो.

Crime News
Shiv Sena Political Crisis : उद्धव ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाणांचं ऐकलं असतं तर, निकाल वेगळा लागला असता!

या वेळी श्रीकांत जाधव यांनी ट्रॅक्टरमधून उतरून कोयत्याने मला आणि माझ्या वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत नाकाचे हाड फॅक्चर झाले असून, डोक्यात व डाव्या हाताला मुका मार लागला आहे. आई सीमा आणि बहीण गायत्री यांनाही दत्तात्रय जाधव यांनी दांडक्याने मारहाण केली आहे. अधिक तपास कोरेगाव पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com