
सातारा : महागाव (ता. सातारा) येथे जमिनीच्या वादातून महिला व मुलाला दांडक्याने मारहाण करून पिस्तुलाने हवेत गोळीबार करत दहशत माजविल्याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयसिंह सर्जेराव जाधव (रा. क्षेत्रमाहुली) असे संशयिताचे नाव असून, त्यास अटक करण्यात आली आहे.