
पाटण : जमीन पसंती देऊन वर्ष उलटून गेले, तरी आजतागायत ताबा दिला जात नाही, उलट नवनवीन त्रुटी काढून विनाकारण शासनाकडून वेळकाढू धोरण घेतले जात आहे. यावर उपाय काढून तातडीने जमीन वाटप सुरू न केल्यास पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांसह इतर जिल्ह्यात विभागलेले कोयना धरणग्रस्त सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एप्रिलच्या मध्यावर बेमुदत आंदोलन करतील, जमीन वाटप सुरू झाल्याशिवाय घरी जाणार नाहीत, असा निर्धार धरणग्रस्तांनी आज केला.