
वहागाव: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीतील एका ढाब्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कुरिअर कंपनीच्या ट्रकचा पत्रा कापून लाखो रुपयांचे लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. १५ जुलैला दाखल झालेल्या फिर्यादीवरून ट्रकच्या दोन्ही चालकांवर तळबीड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.