
सातारा : पतीच्या हयातीत शेतजमिनीला पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून लागावे, यासाठी शासनाने लक्ष्मी मुक्ती योजना सुरू केली आहे; पण या योजनेला जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शंभर दिवस कृती आराखड्यात केवळ ११८९ लक्ष्मींची नावे सहहिस्सेदार म्हणून लावली गेली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातून सर्वाधिक ३७६ शेतकऱ्यांनी पत्नीच्या नावाच्या सातबारा नोंदी केल्या आहेत.