काेण आहे नाराज? उदयनराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

काेण आहे नाराज? उदयनराजे

सातारा : सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी आज (बुधवारी) जलमंदिर पॅलेस येथे आघाडीतील नगरसेवक- नगरसेविका यांची बैठक बाेलावली हाेती. या बैठकीस प्रारंभ झाला आहे. या बैठकीस नगराध्यक्षा माधवी कदम (madhavi kadam) , उपाध्यक्ष मनाेज शेंडे (manoj shende) यांच्यासह माजी उपाध्यक्ष किशाेर शिंदे, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, माजी उपाध्यक्ष राजू भाेसले, नगरसेवक सुहास राजेशिर्के आदी उपस्थित आहेत. (latest-satara-marathi-news-udayanraje-bhosale-meeting-corporators)

गेल्या दाेन दिवसांपासून खासदार उदयनराजे भाेसले यांनी सातारा शहर आणि हद्दवाढीत आलेल्या क्षेत्रात जास्ती जास्त मूलभुत सुविधा द्याव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आजच्या बैठकीत नगरसेवक-नगरसेविकांकडून त्यांच्या प्रभागात काेणती कामे राहिली आहेत याची विचारणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: उदयनराजेंच्या कारभारावर शिवेंद्रसिंहराजे नाराज; खासदारांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट

याबराेबरच काेणामध्ये काही कूरब-या असतील तर त्यांनी सांगाव्यात. जेणेकरुन राजकारणातील हिरमुसलेल्यांमुळे शहराच्या विकासावर परिणाम व्हायला नकाे अशी भुमिका उदयनराजेंची असल्याचे सांगण्यात आले.

ब्लाॅग वाचा

टॅग्स :Udayanraje BhosaleSatara