esakal | 'अंनिस'चं हिंदू धर्मातील अंधश्रद्धांविरोधात काम; डॉ. दाभोलकरांकडून आरोपाचं खंडन
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Hamid Dabholkar)

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीवर 'अंनिस' फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला जात आहे.

'अंनिस'चं हिंदू धर्मातील अंधश्रद्धांविरोधात काम; डॉ. दाभोलकरांकडून आरोपाचं खंडन

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीवर (Superstition Eradication Movement) "अंनिस' फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांच्या विरोधात काम करत असल्याचा तसेच "अंनिस'ला चर्चकडून निधी पुरविला जातो, असे आरोप केले जातात. पण, हे आरोप खोटे आहेत. "अंनिस' सर्वच धर्मातील अंधश्रद्धांच्या विरोधी आवाज उठवते, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर (Dr. Hamid Dabholkar) यांनी नमूद केले. (Lecture Program Behalf Dr. Narendra Dabholkar Training Center In Satara)

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने (Dr. Narendra Dabholkar Training Center) आयोजित "ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धा, त्यांचे निर्मूलन आणि विवेक' या विषयावर वसई येथील आय. टी. इंजिनियर आणि ख्रिस्ती धर्माचे अभ्यासक डॅनियल मस्करणीस यांचे ऑनलाइन व्याख्यान झाले. त्यावेळी डॉ. दाभोलकर यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ""डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ठाणे जिल्ह्यातील वसई येथे केलेल्या भाषणातून प्रेरणा घेत डॅनियल मस्करणीस, फ्रान्सिस अल्मेडा, उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व अंनिस वार्तापत्रावरील खटले उच्च न्यायालयात विनामोबदला लढविणारे ऍड. अतुल अल्मेडा यांनी प्रामुख्याने ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धाविरोधात संघर्ष करणाऱ्या विवेक मंचची स्थापना केली. माणूस मारला तरी विचार मरत नाही, या विचारांतून हा मंच डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतरही कार्यरत राहिला''

डॅनियल मस्करणीस यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धांचे स्वरूप समजावून देण्याआधी त्या धर्माच्या उगम, प्रसार, अंतर्गत मतभेद व त्यातून निर्माण झालेले पंथ यांचा संक्षिप्त इतिहास सांगितला. धर्माचे मूळ विचार व चर्चचे आचार यांत वेळोवेळी उद्भवलेल्या विसंगती व संघर्ष त्यांनी नमूद केले. हीच विसंगती ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धा व कर्मकांडांना कारणीभूत ठरल्याचे त्यांनी सांगितले. येशूंनी शिकविलेली नीती पुढे नेण्यासाठी चर्च ही व्यवस्था निर्माण केली गेली. पण, आज ही व्यवस्थाच कर्मकांडी बनल्याची टीका ऍड. अतुल अल्मेडा यांनी केली. फ्रान्सिस अल्मेडा यांनी प्रास्ताविक केले. वंदना माने व प्रशांत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले.

Lecture Program Behalf Dr. Narendra Dabholkar Training Center In Satara

हेही वाचा: अन्नाच्या शोधार्थ परदेशी गिधाडाची 'सह्याद्री'त गिरकी; 'व्याघ्र'त दुर्मिळ 'ग्रिफॉन'ची नोंद