Dhebewadi News : डोंगरात चरायला सोडलेल्या जनावरांच्या कळपावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात खोंडाचा मृत्यू झाल्याची घटना बाचोली (ता. पाटण) जवळच्या शिवारात घडली.खोंड अर्धवट खाल्लेल्या स्थितीत आढळून आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
ढेबेवाडी : डोंगरात चरायला सोडलेल्या जनावरांच्या कळपावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात खोंडाचा मृत्यू झाल्याची घटना बाचोली (ता. पाटण) जवळच्या शिवारात घडली. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे त्या परिसरात घबराटीचे वातावरण आहे.