

Nhalewadi Leopard Attack Two Year Old Dies in Satara Citizens Demand Action Against Forest Officials Over Safety Lapses in Area
esakal
सातारा : न्हाळेवाडी (ता.सातारा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बालकाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून, शवविच्छेदन विभागाबाहेर स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत बालकाचे पार्थिव ताब्यात घेणार नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.