
ढेबेवाडी : रात्रीच्या सुमारास घराच्या कट्ट्यावर झोपलेल्या कुत्र्याला तेथेच दबा धरून बसलेल्या बिबट्याने पळवून नेल्याची घटना मालदनफाटा (ता. पाटण) येथे घडली. सकाळी कुत्रे कुठे दिसत नसल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर हा प्रकार समोर आला. वर्दळीच्या ठिकाणी लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने त्या परिसरात घबराटीचे वातावरण आहे.