कुत्र्याच्या शिकारीसाठी आलेला बिबट्या घरात घुसला, गावकऱ्यांची पळापळ

काल रात्री हेळवाक गावात घरात घुसलेला बिबट्या वन्यजीव विभागाने यशस्वीरीत्या पिंजऱ्यात पकडला आहे.
Leopard
Leopard sakal
Updated on
Summary

काल रात्री हेळवाक गावात घरात घुसलेला बिबट्या वन्यजीव विभागाने यशस्वीरीत्या पिंजऱ्यात पकडला आहे.

पाटण - हेळवाक (ता पाटण) येथे सुधीर कारंडे यांच्या राहत्या घरात बिबट्या शिरला आहे. कारंडे घरातील सर्व हे देवी विसर्जनासाठी घराबाहेर होते. बिबट्या आत कुत्र्याच्या मागे शिरला आणि हे पाहून कारंडे यांनी घराचे दार बंद केले. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला मिळतात वनविभागाची सर्व टीम वनक्षेत्रपाल घटनास्थळी पोहचले. दरम्यान काल रात्री हेळवाक गावात सुधीर कारंडे यांच्या घरात घुसलेला बिबट्या वन्यजीव विभागाने यशस्वीरीत्या पिंजऱ्यात पकडला आहे.

रात्री उशीरा पर्यंत वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल (हेळवाक) संदीप जोपाळे, वनक्षेत्रपाल (कोयना) संदीप कुंभार व वन्यजीव विभागाचे वनपाल व वनरक्षक हे तत्परतेने घटनास्थळी पोहचले. व बिबट्यास यशस्वीरीत्या पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. सदर बिबट्या हा लहान (वर्षभराचा) असून त्याच्या एका डोळ्यास बहुतेक मोतीबिंदू सारखे आहे. तर मागील उजव्या पायास तो लंगडत आहे.

सदर बिबट्यास वैद्यकीय पुढील उपचारासाठी विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी हलविण्यात येणार आहे. सदर बिबट्यास सुखरुप पकडण्यासाठी विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सहायक वनसंरक्षक तुषार ढमढेरे, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, सर्व वन्यजीव विभागाचे स्टॅफ यांनी अथक प्रयत्न केले. तसेच  स्थानिकांनी ही मोठे सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com