Leopard Cubs : दुरावलेली बिबट्याची चार पिल्ले अखेर आईच्या कुशीत

ऊसतोडणी सुरू असताना चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील शेतात आढळून आलेली बिबट्याची चार पिल्लांची बिबट्या मादीसोबत भेट घडवून आणण्यात वन विभाग व कऱ्हाड वाईल्ड हार्ट रेस्कूअर नाईट टीमला रात्री उशिरा यश आले.
Leopard Cubs
Leopard Cubssakal
Updated on

कऱ्हाड - ऊसतोडणी सुरू असताना चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील शेतात आढळून आलेली बिबट्याची चार पिल्लांची बिबट्या मादीसोबत भेट घडवून आणण्यात वन विभाग व कऱ्हाड वाईल्ड हार्ट रेस्कूअर नाईट टीमला रात्री उशिरा यश आले. त्यातील एका पिल्लाला सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी, तर काही अंतराच्या फरकाने दुसरे, तिसरे व चौथे पिल्लूही मादी घेऊन गेली. या पिल्लांमध्ये तीन नर, तर एका मादीचा समावेश आहे. महिना- सव्वामहिन्याची ही पिल्ले असल्याचे सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com