
राजाळे : आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गावर निंभोरे (ता. फलटण) येथे एका वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी, की लोणंद-फलटण रस्त्यावरील निंभोरे येथील राजेंद्र बाबूराव अडसूळ शेतात काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या हा मृत अवस्थेत आढळून आला.