सातारा : किरपेतील बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेवून सुरक्षित स्थळी हलवले
leopard cage
leopard cagesakal
Updated on

कराड : किरपे येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आजपहाटेच्या सुमारास बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेवून सुरक्षित स्थळी हलवले आहे. किरपे येथील शेतात बिबट्याने राज धनंजय देवकर या ५ वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांचे वडील धनंजय देवकर यांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याला प्रतिकार केल्याने ते बिबट्याच्या तावडीतून मुलाचा प्राण वाचवण्यात यशस्वी झाले.

leopard cage
अकोला : अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्यास पाच वर्षांची शिक्षा

त्यानंतर वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याच्या दोन दिवसानंतरच परिसरात ऊसतोड मजुरांना बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. किरपे येथील मौवटी नावाच्या शिवारात नारायण मंदिराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी ग्रामस्थ विद्याधर देवकर, आनंदा देवकरयांनी पोलीस पाटील प्रवीण तिकवडे यांना बोलावून बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याचे दाखवले. त्यानंतर इतर ग्रामस्थांना याबाबतची कल्पना येण्याआधीच ग्रामस्थांचा उद्रेक टाळण्याच्या हेतूने वनविभागाने बिबट्याला अन्यत्र हलवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com