सावधान! येळगाव, येवतीसह भागात बिबट्याचा मुक्तसंचार

जगन्नाथ माळी
Friday, 18 September 2020

गेल्याच आठवड्यात येळगाव-येणपे रस्त्यावर असलेल्या बाजीराव कांबळे यांच्या पाळीव कुत्र्यावर असाच हल्ला करून बिबट्याने त्यांचा कुत्राच गायब केला होता. शेतात वैरणीला सकाळी लवकर उठून गेलेल्या शेतकऱ्यांना तसेच रात्री उशिरापर्यंत आपल्या घरी परतणाऱ्या वाहनधारकांनाही अनेकदा बिबट्याचे दर्शन घडत असल्याने शेतकरी वर्गासह जनतेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उंडाळे (जि. सातारा) : येळगाव (ता. कऱ्हाड) येथे गेल्या अनेक दिवसांपासून येळगाव, येवतीसह डोंगरी विभागात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू आहे. तो सध्या कुत्र्यांवर ताव मारून भूक भागवत असल्याने अनेक कुत्री आजवर त्याच्या भक्ष्यस्थानी पडली असल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अचानक दोन दिवसांपूर्वी अगदी रात्री दहाच्या सुमारास येथील माने कुटुंबीयांच्या सॉ मिलमध्ये घुसून बिबट्याने गाड्यावर साखळीने बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्यावर अचानक हल्ला केला. माने कुटुंबिय कुत्रा जोरजोरात का ओरडतोय म्हणून खाली येऊन पाहतात तो बिबट्याने कुत्र्याला ठार मारून त्याचे रक्त पिऊन पलायन केले होते. त्यांनी आरडाओरडा केल्याने आसपासचे लोक जमा झाले. त्यांनी बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याच्या पावलांचे ठसठशीत ठसे ओल्या मातीत आढळून आले. 

चीन-भारत संघर्ष : महाराष्ट्रातील जवान हुतात्मा

गेल्याच आठवड्यात येळगाव-येणपे रस्त्यावर असलेल्या बाजीराव कांबळे यांच्या पाळीव कुत्र्यावर असाच हल्ला करून बिबट्याने त्यांचा कुत्राच गायब केला होता. शेतात वैरणीला सकाळी लवकर उठून गेलेल्या शेतकऱ्यांना तसेच रात्री उशिरापर्यंत आपल्या घरी परतणाऱ्या वाहनधारकांनाही अनेकदा बिबट्याचे दर्शन घडत असल्याने शेतकरी वर्गासह जनतेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leopard Is Roaming Freely In The Hilly Areas Including Yelgaon And Yevati Satara News