Leopard Attack : मेंढरांच्या कळपांजवळच बिबट्ट्यांचा मुक्काम; बिबट्याने कळपातील घोड्याला केले जखमी

Patan News : रब्बीचा हंगाम संपताना ढेबेवाडी खोऱ्यात विविध दुष्काळी पट्ट्यातून मेंढरांचे कळप दाखल होतात. पावसाळ्यापर्यंत त्यांचा येथे मुक्काम असतो. या काळात शेतकरी आपल्या शिवारात खतासाठी कळप बसवितात.
Leopard Attack
Leopard Attack sakal
Updated on

ढेबेवाडी : रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने विविध जिल्ह्यांतून मेंढरांचे कळप या परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शिवारात मेंढरांच्या कळपांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढल्याने मेंढपाळ चिंतेत असून, मालदन नजीकच्या शिवारात रात्रीच्या सुमारास कळपाजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील घोड्याला जखमी करून शिंगरू पळवून नेल्याची घटना नुकतीच घडल्याने मेंढपाळांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com