esakal | आगाशिवच्या डोंगरात बिबट्याची दहशत; नागरिकांकडून बंदोबस्ताची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

आगाशिवच्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे.

आगाशिवच्या डोंगरात बिबट्याची दहशत

sakal_logo
By
राजेंद्र ननावरे

मलकापूर (सातारा) : आगाशिवच्या डोंगराच्या (Agashiv Mountain) पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. जखीणवाडी गावातील शेतकऱ्याचा बिबट्याने (Leopard) पाठलाग केला तर ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या नागरिकांना बिबट्या दिसला. त्यामुळे श्रावणी सोमवारी आगाशिव डोंगरावर जाणारे भक्त व नागरिकांमध्ये बिबट्याच्या दहशतीचे सावट आहे.

बिबट्याचा हल्ला होण्याच्या व दिसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बछड्यासह बिबट्याचे शेतकऱ्यांना दोन वेळा दर्शन झाले. गेल्या काही वर्षांपासून आगाशिव डोंगराभोवतीच्या गावात अनेकवेळा बिबट्याने जनावरे ठार केली आहेत. गेल्या काही महिन्यांत चचेगाव, आगाशिवनगर, जखिणवाडी, धोंडेवाडी, नांदलापूर शिवारात शेतातील वस्तीवरील शेळ्या ठार केल्या आहेत. काही वेळा तर रानातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करत पाच पाच शेळ्या ठार केल्या आहेत. त्यामुळे या परिसरात किमान महिन्यातून एकदा किंवा दोनदा बिबट्याचा हल्ला होण्याचे समीकरणच झाले आहे.

हेही वाचा: NCP च्या आमदार शिंदेंना चुकांच्या परिमार्जनाची संधी

आगाशिव डोंगरपायथ्याला मुनावळे गावालगत चार शेळ्या फस्त केल्या होत्या. हा हल्ला एका बिबट्याचा नसून बिबट्यांच्या कळपाचा असावा, असा अंदाज वन विभागाने घटनास्थळी वर्तवला होता. या अंदाजाप्रमाणे साधारणतः एक वर्षाच्या दोन बछड्यांसह मादी बिबट्याला पाहिल्याचे काही शेतकऱ्यांनी त्यावेळीही सांगितले होते. नांदलापूरसह कापीलमळा परिसरात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर होता. तसे परिसरातील काही शेतकऱ्यांना या कळपाचे दर्शनही झाले आहे. हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे या परिसरातील शेतकरी रानात जाण्यासाठी धजावत नाहीत. डोंगरालगतच्या गावात बिबट्यांचा कळपानेच वावर आहे, हे या घटनांवरून सिद्ध होत आहे.

हेही वाचा: लोकसभेनंतर महापालिका निवडणुकीत भाजपची बाजी

डोंगर सुनासुना राहणार

आगाशिव डोंगरावर महादेवाचे मंदिर आहे. श्रावणातील सोमवारी येथे यात्रा भरते. कऱ्हाड, आगाशिनगर, जखिणवाडी, विंग, चचेगाव, धोंडेवाडी, नांदलापूर या भागातील भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येतात. मात्र, बिबट्याच्या दहशतीमुळे आता डोंगर सुनासुना राहणार असल्याचे दिसत आहे. यापूर्वीच्या सोमवारी यात्रेकरूंची गर्दी दिसली नाही.

loading image
go to top