
गृहराज्यमंत्री देसाई हे पाटण मतदारसंघातील दौलतनगर येथील निवास्थानी मुक्कामी होते.
दौलतनगरात गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बिबट्या
मल्हारपेठ सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या दौलतनगर (ता. पाटण) येथील निवासस्थान परिसरात बिबट्याचा (Leopard) वावर आढळून आला. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गृहराज्यमंत्री देसाई हे काल पाटण मतदारसंघातील दौलतनगर (Daulatnagar) येथील निवास्थानी मुक्कामी होते. त्यामुळे सकाळपासूनच दौलतनगर परिसर गर्दीने गजबजून गेला होता. रात्री आठच्या दरम्यान मंत्री देसाई यांची कार्यकर्त्यांसमवेत बैठक सुरू असतानाच त्यांच्या निवासस्थानाबाहेर अचानक बिबट्या बगिचातून चालत येऊन बंगल्याला फेरफटका मारून निघाल्याचे बंगल्याबाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्याचक्षणी सुरक्षा रक्षकाने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा: पिळदार मिशांचा पक्षी कधी पाहिलाय? 'या' पक्षाचा आहे रुबाबच न्यारा
मात्र, अंधाराचा फायदा घेऊन हा बिबट्या बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूने मरळीकडे निघून गेला. या वेळी मंत्री देसाई यांच्या बंगल्याबाहेर उपस्थित कार्यकर्त्यांनी मात्र बिबट्याला बिनधास्त वावरताना पाहिल्याने आरडाओरडा केला. त्यामुळे दौलतनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा: सौदी अरेबियात मोठी कारवाई; 40 उंटांना काढलं सौंदर्य स्पर्धेतून बाहेर
Web Title: Leopards Near Shambhuraj Desai Daulatnagar House
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..