Video : काेयना, महाबळेश्वरातील पाऊस ओसरला; घाटातील धबधबे वाहू लागले

Video : काेयना, महाबळेश्वरातील पाऊस ओसरला; घाटातील धबधबे वाहू लागले

कोयनानगर (जि.सातारा) ः गेल्या पाच दिवसांपासून दमदार पडणाऱ्या पावसाचा जोर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कमी झाला आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली असली, तरी धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासांत दोन टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात 41.34 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
ते आले... जेवले... गप्पा मारल्या अन्‌... 
 
गेल्या 24 तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर 41 मिलिमीटर, नवजा 81 मिलिमीटर, तर महाबळेश्वर 29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (शुक्रवार) दिवसभरात पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयनानगर येथे 10/1350 मिलिमीटर, नवजा 35/1395 मिलिमीटर, तर महाबळेश्वर 30/1360 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 9,217 क्‍युसेक झाली आहे. धरणाची जलपातळी 2096.2 फूट झाली असून, धरणात 41.34 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

सरकारच्या भूमिकेच्या निषेर्धात राज्यातील ही दुकाने रविवारपर्यंत बंद राहणार

दरम्यान सातारा जिल्ह्यात आज (शुक्रवार) पहाटे आणि गुरुवार (ता.9) दिवसभरात एकूण 1607.00 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 17.66 मिली मीटर पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 13.52 (282.32) , जावळी- 27.40 (503.56), पाटण-14.91 (452.45) , कराड-13.00 (226.23) , कोरेगाव-10.33 (206.44), खटाव- 23.08 (211.46) , माण- 17.43 (147.29) , फलटण- 17.44 (181.33) , खंडाळा- 6.00 (149.45 ) , वाई – 5.57 (287.17). याप्रमाणे आजपर्यंत एकूण 4092.73 मिली मीटर तर सरासरी 372.07 मिली मीटर पावसाची  नोंद झाली आहे.

कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांच्या पदवी आणि अभियांत्रिकीच्या परीक्षाचा 'हा' झाला निर्णय... 
 
साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालयाचे पालकांना आवाहन; वाचा सविस्तर

 

केळघर : जावळी तालुक्‍यात पावसाचा जाेर आहे. केळघर घाटातून महाबळेश्वरला जाताना नयनरम्य धबधबे नजरेस पडत आहेत. मात्र, सध्या कोरोनाने थैमान घातल्याने पर्यटकांची या धबधब्याकडे फार कमी संख्या आहे. 

केळघर घाटातील हे धबधबे पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडतात. केळघर घाटातून मार्गक्रमण करताना पर्यटक धबधब्यांच्या ठिकाणी आवर्जून थांबतात. महाबळेश्वरला जाताना हे धबधबे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरले आहेत. मात्र, सध्या कोरोनाने थैमान घातल्याने पर्यटकांनी या धबधब्यांकडे पाठ फिरवली आहे. दरवर्षी हे धबधबे पर्यटकांनी फुललेले असतात. मात्र, 
यावर्षी पर्यटक नसल्यामुळे धबधबे ओस पडले आहेत. पावसाळी पर्यटनासाठी केळघर घाटामधील

हे धबधबे नेहमी गर्दीने ओसंडून वाहत असायचे. परिणामी केळघर बाजारपेठेतही पर्यटकांची गर्दी असायची. आता पर्यटकांची संख्या कमी आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com