esakal | ‘..तर किसन वीर’ ची निवडणूक लढवू : आमदार पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

‘किसन वीर’ ची निवडणूक लढवू : आमदार पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कवठे : माझे आणि कारखान्याच्या अध्यक्षांचे जर साटेलोटे असते तर ते माझ्याविरोधात विधानसभेच्या (Legislative Assembly ) निवडणुकीसाठी (Election) उभे राहिले असते का? पंचायत समितीच्या निवडणूकीत भुईंज गणातून त्यांच्या घरातील महिला उमेदवाराविरोधात आमचा उमेदवार (Candided) देवून तो निवडूण तरी आणला असता का? याबाबत काही मंडळी जाणून बुजून अपप्रचार करीत असल्याचे आमदार (MLA) मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी नमूद केले.

कवठे, येथील आमदार निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ‘‘गेल्या १६- १७ वर्षांत कारखान्यातील सत्तेच्या फक्त दुरुपयोगच केला. राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांत किसन वीर कारखाना दिसेल. परंतू, आज दुर्दैवाने शेवटच्या दहा कारखान्यात हा कारखाना दिसत आहे. कारखान्याचे भागभांडवल जवळपास ९० कोटींचे आहे. तर कारखान्याचा तोटा जवळपास २०० कोटींचा आहे. कोणतीही बँक या कारखान्याला कर्ज देवू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज जवळपास एक हजार कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे. कामगारांना पगार मिळू शकत नाही हे दुर्दैव आहे. कारखान्याच्या या स्थितीबाबत जेष्ठ नेते शरद पवार यांच्याशी दोन वेळा चर्चा केली असून पुन्हा पुढील आठवड्यात याबाबत बैठक होणार आहे. त्यातून समाधानकारक तोडगा निघाल्यास कारखान्याची निवडणूक लढवू.’’

हेही वाचा: बिर्याणी नव्हे यावेळी ट्राय करा हैदराबादी बैंगन

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष महादेव मस्कर यांचे भाषण झाले. कार्यक्रमास जिल्हा परीषद सदस्या संगिता मस्कर, प्रकाश चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती संगिता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, अनिल जगताप, मधुकर भोसले, महादेव मस्कर, सत्यजित वीर, शशिकांत पवार, दिलीप बाबर, रवींद्र जाधव, सरपंच श्रीकांत वीर, अंकुश कांगडे, बाळासाहेब पवार, दिलीप मोरे, कृष्णराव डेरे, मारूती पोळ, माधवराव डेरे, राहुल डेरे, राजेंद्र पोळ, संदिप डेरे, गोरख चव्हाण दत्तात्रय पोळ, शिवाजी करपे, नाना देवकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top