कोरेगाव तालुका पाणीदार करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Sayaji Shinde

कोरेगाव तालुका पाणीदार करू

कोरेगाव - सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून कोरेगाव तालुका पाणीदार करण्याचा निर्धार सह्याद्री देवराई प्रकल्पाचे प्रवर्तक आणि चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला. कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात सह्याद्री देवराई प्रकल्पातर्फे तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांच्या विशेष बैठकीत अभिनेते श्री. शिंदे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, नायब तहसीलदार सारिका शिंदे, सहायक गटविकास अधिकारी सपना जाधव, विस्तार अधिकारी संजय बाचल, महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष, नागझरीचे सरपंच जितेंद्र भोसले उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, "जिल्ह्यात सह्याद्री देवराई प्रकल्प यशस्वी होताना आता या प्रकल्पाच्या माध्यमातून कोरेगाव तालुका पाणीदार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यात सर्वांनी योगदान दिल्यास ते अशक्य नाही. कोरेगाव तालुक्याच्या पाठीमागे टंचाईग्रस्तचा लागलेला शब्द तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व संगोपन पूर्ण ताकदीने करून पुसून काढण्यात येईल. यावेळी श्री. शिंदे यांनी सह्याद्री देवराई प्रकल्पाची आवश्यकता, ग्रामस्थांचा सहभाग व पर्यावरण संतुलनाचे महत्त्‍वही सांगितले.

गटविकास अधिकारी बोराटे यांनी सह्याद्री देवराईच्या कामाचे कौतुक करून त्यात सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले. जायगावचे सरपंच नाथाभाऊ कदम यांनीही वृक्षारोपणाचे महत्त्‍व सांगितले. गोळेवाडीच्या शंकर गोळे यांनी परिसरातील ३३ गावांच्या वतीने करण्यात येणाऱ्या सहा हजार ६६६ झाडांच्या वृक्षारोपणाचे नियोजनाची माहिती दिली. किरण कंठे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेवक धनंजय सस्ते यांनी आभार मानले.

Web Title: Lets Make Koregaon Taluka Water Rich Actor Sayaji Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top