पालिका सभांतील ठरावांवर जागच्याजागी स्वाक्षरी घ्या : नगराध्यक्षांचे अधिकाऱ्यांना पत्र

सचिन शिंदे
Saturday, 24 October 2020

ठराव वेळेवर मिळत नसल्याने शहराच्या दृष्टीने महत्त्वाची कामे खोळंबून राहात आहेत. त्यामुळे त्या ठरावाच्या स्वाक्षरीवरून गेल्या आठवड्यात आरोप-प्रत्यारोप झाले. त्या वेळी मुख्याधिकारी डाके यांनी नगरसेवकांना पत्र दिले होते. त्यात ठराव वेळेवर प्राप्त होत नाही, असे उल्लेख करत त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातून माघार घ्यावी लागेल, असे म्हटले होते.

कऱ्हाड (जि. सातारा) : पालिकेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीमधील ठराव बैठक संपताच त्याचठिकाणी त्याची पूर्तता करून सही करून झाली पाहिजे. त्याबाबत कोणतीही दिरंगाई झाल्यास त्यासाठी आपणास जबाबदार धरले जाईल, असे पत्र नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह पालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना दिले आहे. 

ठराव वेळेवर मिळत नसल्याने शहराच्या दृष्टीने महत्त्वाची कामे खोळंबून राहात आहेत. त्यामुळे त्या ठरावाच्या स्वाक्षरीवरून गेल्या आठवड्यात आरोप-प्रत्यारोप झाले. त्या वेळी मुख्याधिकारी डाके यांनी नगरसेवकांना पत्र दिले होते. त्यात ठराव वेळेवर प्राप्त होत नाही, असे उल्लेख करत त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातून माघार घ्यावी लागेल, असे म्हटले होते. त्यामुळे पालिकेत खळबळ उडाली होती. त्या ठरावावरील स्वक्षऱ्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. 

कऱ्हाडात बिहार पॅटर्न यशस्वी; 157 गावांतील 69 हजार वृक्षांना जीवदान

जनशक्ती आघाडीचे राजेंद्र यादव यांनी नगराध्यक्षांवर, तर नगराध्यक्षा शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील व त्यांच्या नगरसेवकांनी पलटवार केला होता. त्यामुळे ठरावानंतर त्याच ठिकाणी त्याबाबतची पूर्तता करून स्वाक्षऱ्या घ्याव्यात, अशा सूचना पत्राद्वारे नगराध्यक्षा शिंदे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter From Mayor Rohini Shinde To The Officials Satara News