खासदार पाटलांच्या पत्राने बांधकाम यंत्रणा हलली, रात्रीत बुजवले कृष्णा पुलावरील खड्डे!

सचिन शिंदे
Thursday, 1 October 2020

कऱ्हाड-विटा राज्यमार्गावरील कृष्णा पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. विटा, जत, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर, मसूर, पुसेगाव मार्गावरील वाहतूक या पुलावरून होते. सातत्याने वाहनांची वर्दळ असल्याने पुलावर वाहतुकीचा मोठा ताण असतो. वाहनांच्या सतत्याने असणाऱ्या वर्दळीमुळे आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुलावरील रस्त्यावर खड्डे पडले होते. याची तत्काळ दखल घेण्यात आली.

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड-विटा मार्गावरील येथील कृष्णा पुलावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती. त्याची दखल घेऊन खासदार श्रीनिवास पाटील यांनी संबंधित खड्डे तातडीने भरण्यासाठी बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करून सूचना केल्या होत्या. त्याची दखल घेऊन एका रात्रीतच बांधकाम विभागाने पुलावरील खड्डे भरले. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

कऱ्हाड-विटा राज्यमार्गावरील कृष्णा पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. विटा, जत, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर, मसूर, पुसेगाव मार्गावरील वाहतूक या पुलावरून होते. सातत्याने वाहनांची वर्दळ असल्याने पुलावर वाहतुकीचा मोठा ताण असतो. वाहनांच्या सतत्याने असणाऱ्या वर्दळीमुळे आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुलावरील रस्त्यावर खड्डे पडले होते. त्याचबरोबर कृष्णा नाक्‍यापासून कृष्णा कॅनॉलपर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले होते. त्याचबरोबर पावसाळ्यात पावसाचे पाणी साचूनही खड्ड्यांत वाढ झाली होती. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती. 

कऱ्हाडला लोकवर्गणी न भरल्याने 249 घरांची योजना गुंडाळली

त्याचा विचार करून खासदार पाटील यांनी बांधकाम विभागाला पत्र पाठवून संबंधित पुलावरील खड्डे भरण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याची तातडीने दखल बांधकाम विभागाने घेतली. त्यांनी काल रात्रीच पुलावरील खड्डे मुजवण्याचे काम हाती घेतले. पहाटेपर्यंत खड्डे मुजवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे वाहनधारकांची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter From MP Srinivas Patil To The Construction Department Satara News