सातारा जिल्ह्यातील लिंबमध्ये शुकशुकाट; चार ऑक्‍टोबरपर्यंत जनता कर्फ्यू

प्रशांत गुजर
Tuesday, 29 September 2020

या बंदमधून अत्यावश्‍यक सेवा म्हणून असणारे दवाखाने, मेडिकल, गॅस एजन्सी आणि दूध डेअरी हे फक्त सुरू ठेवण्यात आले आहेत. 

सायगाव (जि. सातारा) : लिंब (ता. सातारा) येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने सात दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. लिंब परिसरातील सर्व व्यवसाय व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. 

परिसरातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आजअखेर ही संख्या ऐंशीच्या वर पोचली असून, हा आकडा अजूनही वाढतच असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी तसेच व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

तु ह्या लढाईत एकटी नाहीस म्हणत पायल घोषला शर्लिन चोप्रा आणि कंगनाचा पाठिंबा 

आजपासून चार ऑक्‍टोबरअखेर सात दिवस लिंब गाव पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे. या बंदमधून अत्यावश्‍यक सेवा म्हणून असणारे दवाखाने, मेडिकल, गॅस एजन्सी आणि दूध डेअरी हे फक्त सुरू ठेवण्यात आले आहेत. 

कोरेगावच्या उपाध्यक्षपदी मंदा बर्गे बिनविरोध

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Limb Village Lockdown Till Four October Satara News