esakal | वडुजात शेताच्या बांधावरच मद्यपी टोळक्यांच्या ओल्या पार्ट्या; शेतकऱ्यांत संताप
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers

लॉकडाउनमुळे काही अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार, बाजारपेठ, हॉटेल, मनोरंजन, शिक्षण आदी सेवा बंद आहेत.

वडुजात शेताच्या बांधावरच मद्यपी टोळक्यांच्या ओल्या पार्ट्या; शेतकऱ्यांत संताप

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ वारा अशा संकटांना तोंड देणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांना आता मद्यपींच्या टोळक्यांनी फोडलेल्या दारूच्या बाटल्या व काचांचा सामना करावा लागत आहे. सद्या लॉकडाउनमुळे (coronavirus lockdown) मद्यपींच्या टोळक्यांनी ओल्या-सुक्या पार्ट्यांसाठी परिसरातील शेतांकडे मोर्चा वळविला आहे. शेतांत ठिकठिकाणी दारूच्या (Alcohol) रिकाम्या बाटल्या व काचा सापडत असल्याने शेतकरी (Farmers) वर्गातून संताप व्यक्त होत आहे. (Liquor Parties At Farm In The Vaduj Area Satara Marathi News)

लॉकडाउनमुळे काही अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार, बाजारपेठ, हॉटेल (Hotel), मनोरंजन, शिक्षण आदी सेवा बंद आहेत. त्यामुळे परिसरातील उंबर्डे, हिंगणे, तडवळे, मांडवे, पेडगाव, सातेवाडी, गणेशवाडी, वाकेश्वर गावांच्या शिवारातील शेतांकडे मद्यपींनी मोर्चा वळविला आहे. त्याठिकाणी ओली- सुकी पार्टी करून दारूच्या रिकाम्या बाटल्या शेतांतच टाकल्या जात आहेत. काही बाटल्या शेतातच फोडल्या जात आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून परिसरातील शिवारांत दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून येते.

हेही वाचा: आंदाेलन वगैरे करणे ही फालतूगिरी आता जाब विचारा जाब : उदयनराजे

काही वेळा संबंधित शेतकऱ्यांनी या मद्यपींना हटकण्याचा प्रयत्न केला असता वादविवादाचे प्रसंगही निर्माण झाले आहेत. सध्या शेतकऱ्यांची नांगरणी, मशागत, खते विस्कटणे, पेरणीची कामे सुरू आहेत. त्यासाठी शेतकरी कुटुंबीयांसह शेतात शेतीकामासाठी जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांना पहिल्यांदा याठिकाणी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या तसेच फोडलेल्या बाटल्यांच्या काचा गोळा करण्याचेच काम करावे लागत आहे. माळरानांतही अनेक ठिकाणी अशा दारूच्या रिकाम्या व फोडलेल्या बाटल्या आढळून येत आहेत. त्याचा त्रासही मेंढपाळांना होत आहे.

हेही वाचा: काळजी करु नका! मी तुमच्या पाठीशी आहे : उदयनराजे

सध्या शेतकरी वर्ग शेतीकामांच्या तयारीला लागला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पहिल्यांदा या दारूच्या बाटल्या गोळा कराव्या लागत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतांत धिंगाणा घालणाऱ्या मोकाट मद्यपींचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा.

-अनिल पवार, राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Liquor Parties At Farm In The Vaduj Area Satara Marathi News