

vishwas patil
sakal
सातारा: छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : छत्रपती संभाजीराजेंवरील माझे ‘संभाजी’ हे पुस्तक २००६ मध्ये प्रकाशित झालेले आहे. दोन-तीन पिढ्यांनी हे पुस्तक वाचलेले आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या माझ्या तरुण मित्रांना यामध्ये काही शंका असेल किंवा पुस्तकात अनावधानाने माझ्याकडून चुकून काही इकडे, तिकडे झाले असेल, तर मोठ्या मनाने ते तत्काळ मागे घेण्याची माझी तयारी आहे, असे स्पष्ट मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.