

Literary Conference Sparks Interest Among New Readers, Strengthens Language Awareness
eSakal
-हेमंत पवार
छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी (सातारा) : मराठी भाषेची वाचक संख्या वाढावी आणि लहान वयापासूनच मुलांनी मराठी वाचनाकडे वळावे, या उद्देशाने मराठी भाषा विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनात आज सामान्य ज्ञानावर आधारित मनोरंजनात्मक भाषिक खेळांतुन नवीन वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमाला सातारकर रसिक वाचक तसेच विविध शाळांतील विद्यार्थी मराठीत बोलून उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.