
सातारा: नांदवळ (ता. कोरेगाव) येथील अजीज शेख या शेतकऱ्याच्या १४ गायींचा आठ दिवसांत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यामध्ये चाऱ्यामधून गायींच्या शरीरात नायट्रेट गेल्याने मृत्यू झाल्याचे कारण अहवालात स्पष्ट झाले आहे.