
सातारा : शहरातील मोती चौकाकडून सोमवार पेठमार्गे फुटक्या तलावाकडे जाणाऱ्या तसेच सुपनेकर भोजनालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवसेंदिवस खड्डे वाढू लागले आहेत. या रस्त्यावर आता डांबरी रस्ता कमी तर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. पालिकेने उखडलेल्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी पाहणी करून तातडीने दुरुस्तीसाठी हालचाली कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होऊ लागली आहे.