

Judicial officers and officials during proceedings of the Medha Lok Adalat where multiple cases were resolved.
Sakal
केळघर : सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मेढा येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये न्यायालयामधील दिवाणी व तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये एकूण २५ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करून एकूण चार लाख २८ हजार ४२ रुपयांची वसुली झाली.