
लोणंद : पंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या मार्गावर निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज दुपारी साडेतीन वाजता येथील अहिल्यादेवी स्मारक चौकात स्वागत करण्यात आले. सोहळा अर्धा तास विसावल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पाडेगावच्या दिशेने सोहळा मार्गस्थ होताच अनेकांचे डोळे पाणावले होते.