लोणंदला चिकन विक्री, कोंबड्यांचा आठवडा बाजार बंद

रमेश धायगुडे
Sunday, 17 January 2021

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी येथील मृत कोंबड्या व मृत कावळ्यांचे पुणे व तेथून भोपाळ येथे पाठवलेल्या स्वॅबचा रिपोर्ट अद्यापही मिळाला नाही. सोमवारपर्यंत रिपोर्ट उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतरच कोंबड्या व कावळे कोणत्या आजारामुळे दगावत असल्याचे नेमकेपणाने समजणार आहे.

लोणंद (जि. सातारा) : मरिआईचीवाडी (ता. खंडाळा) येथील कापरे वस्ती व शिंदे वस्ती येथील घरगुती पोल्ट्री फार्ममधील 85 ते 90 कोंबड्या रोगामुळे दगावल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दहा किलोमीटरचा परिसर "सतर्क क्षेत्र' म्हणून घोषित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार लोणंद शहरातील चिकन विक्रीची सर्व दुकाने, पोल्ट्री फॉर्म व दर गुरुवारी कोंबड्यांचा भरणारा आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे.
 
नगरपंचायतीने संबंधितांना नोटिसा बजावून कळवले आहे, तसेच ध्वनिक्षेपकांवरून शहरातील नागरिकांनाही आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही नगरपंचायतीने केले आहे. दरम्यान, कापरे वस्ती येथे आणखी तीन कोंबड्या दगावल्या आहेत. कापरे वस्ती व शिंदे वस्ती परिसरातील एक किलोमीटर अंतराचा परिसर "अतिसतर्क क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले असून, लोणंदचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरकुमार मुळे व त्यांचे सहकारी हे जिल्हा पशुवैद्यकीय उपआयुक्त डॉ. अंकुश परिहर व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.

महान पुरुषामागे एक स्त्री असते, पण ती पत्नीच असते असं नाही; श्रीनिवास पाटलांच्या वक्तव्याने गाेंधळ

एक किलोमीटर परिसरातील कोणाकडे कोंबड्या आहेत. त्यांची स्थिती काय आहे याचा घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी येथील मृत कोंबड्या व मृत कावळ्यांचे पुणे व तेथून भोपाळ येथे पाठवलेल्या स्वॅबचा रिपोर्ट अद्यापही मिळाला नाही. सोमवारपर्यंत रिपोर्ट उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतरच कोंबड्या व कावळे कोणत्या आजारामुळे दगावत असल्याचे नेमकेपणाने समजणार आहे.

क-हाडातील वाहतुकीत बदल; मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर पाेलिसांचा निर्णय

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonand Chicken Hen Market Closed Till Further Notice Satara Marathi News