
लोणंद : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोन जणांनी संगनमताने एकाचा छातीत चाकू भोसकून, तसेच डोक्यात लाकडी फळकुटाने मारहाण करून खून केल्याची घटना येथे घडली. येथील इंदिरानगर परिसरातील बिरोबा मंदिरात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, किरण किसन गोवेकर (वय ३२, रा. कोरेगाव, ता. फलटण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.