
लोणंद : चारचाकी गाडीचे डिस्क व टायर आदी मुद्देमाल टमटममध्ये भरून चोरून चाललेल्या एका संशयितास लोणंद पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरून चाललेला पावणेतीन लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. काल पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रात्रगस्तीत येथील शास्त्री चौकात ही कारवाई केली. याप्रकरणी रोहित ओमप्रकाश विश्वकर्मा (वय २३, रा. लोणंद, ता. खंडाळा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.