
लोणंद : श्री संत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या आगमनाला केवळ चारच दिवस उरल्याने लोणंद नगरपंचायतीसह सर्वच शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था, संघटना, मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, पालखी तळावर गर्दी नियंत्रणासाठी माऊलींच्या थेट दर्शनासाठी तीन ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावण्यात येत आहेत. दोन दर्शनरांगांचे लाकडी बांबूचे बॅरिकेड्स लावून व्यवस्था केली आहे. बाहेर गावांहून येणाऱ्या व्यावसायिकांनीही दुकाने थाटण्यास सुरुवात केली असून, त्यांचीही तयारीची लगबग सुरू झाली आहे.