कोरोनाचा संकटकाळ, मेटाकुटीला आलाय मेंढपाळ!

कोरोनाचा संकटकाळ, मेटाकुटीला आलाय मेंढपाळ!
Updated on

कुकुडवाड (जि. सातारा) : मेंढपाळ व्यवसाय पाच ते सहा महिन्यांपासून कोरोनाच्या छायेत सापडला असून, मेंढपाळांची परवड सुरू झाली आहे. कोरोनामुळे जनावरांचे बाजार बंद असल्याने, बकऱ्यांची विक्री होत नसल्याने त्यांचा खुराक खिश्‍यास परवडत नसल्याने माणदेशी मेंढपाळ मेटाकुटीला आला आहे. दुसरीकडे व्यापारी घरोघरी जाऊन कमी दराने बकरी खरेदी करत आहेत. मेंढपाळ कोकरांना जिवापाड जपतात. 

कोकरांना दूध, गोळी पेंड, खपरी पेंड, मका, गहू यांचा भरडा, टॉनिक खाद्य म्हणून वापर करतात. तीन ते साडेतीन महिन्यांत ही कोकरे विक्रीस येतात. पण, या वर्षी कोरोनामुळे जनावरांचे बाजार बंद करण्यात आल्यामुळे विक्रीस आलेली आणि विक्रीस न आलेली पिल्ले यांच्या खावटीचा खर्च मेंढपाळांना परवडत नसल्याने व्यापाऱ्यांना तोट्यात देण्याची वेळ आली आहे. माणदेशी बकऱ्यांच्या मटणास कोल्हापूर, कऱ्हाड, सांगली या पश्‍चिम भागात मोठी मागणी असते. कोल्हापूर जिल्ह्यात बकऱ्याच्या मटणास बोलाई असे म्हणतात. 

यावर्षी पावसामुळे जनावरांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. बाजार बंद असल्याने वय झालेली जनावरे विकता येत नसल्याने मेंढपाळांचे आर्थिक नुकसान होत आहे. माणदेशातील मेंढपाळ आटपाडी, म्हसवड, लोणंद, कलेढोण या बाजारात शेळ्या-मेंढ्यांची विक्री करतात. बाजार बंद असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी मेंढपाळांच्या वाडग्यावर जाऊन कमी भावाने खरेदी करत आहेत. 

बाजार सुरू नसल्याने कवडीमोल भावाने मेंढ्या देण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. 
गेल्या वर्षी दुष्काळाचा सामना करत आपली जनावरे कऱ्हाड, वाळवा, पाटण आणि लातूर-बार्शी भागात जगवण्यासाठी नेली होती. यंदा कोरोनाच्या महामारीने मेंढपाळांचे जीवन खडतर बनले आहे. जनावरांचे बाजार सुरू करावेत, अशी मागणी मेंढपाळांनी केली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Tripti Veer bravery saves life on Krishna river bridge
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Why is Vajrai Waterfall famous?
Asia's Second-Largest Banyan Tree in Maharashtra Amazes Tourists and Nature Lovers
Marathi News Esakal
www.esakal.com