सातारा : माण, खटाव, कोरेगावसह सातारा तालुक्यातील १६७ गावांतील ६० हजार ४३७ हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठीच्या (कै.) लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या विस्तारित कामाच्या निविदा जाहीर झाल्या आहेत. आगामी काळात ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर माण-खटावमध्ये हरितक्रांती होऊन तो भाग सुजलाम् सुफलाम् होईल, याचे समाधान असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे नोंदवले आहे.