
अभ्यासाच्या नावाखाली फाईली अडवून ठेवणे, हे कोणत्याही सुज्ञ नागरिकांच्या लक्षात न येणारा विषय असून, नगराध्यक्षांनी त्या अभ्यासाचा उलगडा सर्वांसमक्ष करण्याचे आव्हानही सिद्धी पवार यांनी नगराध्यक्षांना दिले हाेते.
सातारा : वेळ आल्यावर व्याजासह हिशोब चुकता करीन; नगराध्यक्षांचे पवारांना प्रत्युत्तर
सातारा : मी वेळ आल्यावर उत्तर देईन आणि संबंधितांचा व्याजासह हिशोब करीन, असा इशारा नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पालिकेच्या बांधकाम समितीच्या सभापती सिद्धी पवार यांना दिला आहे. साै. पवार यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या कारभारावर काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका केली हाेती. त्यावेळी पवार यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंच्या पराभवात निष्क्रिय नगराध्यक्षांचा मोलाचा वाटा असल्याचा आरोपही केला हाेता.
बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी नगराध्यक्षा कदम यांच्या कारभारावर आक्षेप घेतला होता. हे आक्षेप खोडून काढणारे पत्रक नगराध्यक्षा माधवी कदम यांनी प्रसिद्धीस दिले. त्यानंतर पुन्हा साै. पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्षा कदम यांनी साताऱ्यात स्वनिधीतून कोणतेही ठोस काम उभारलेले नाही. इतरांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात त्या धन्यता मानतात. कोणतेही राजकीय कार्य नसताना सातारकरांनी खासदार उदयनराजेंकडे बघून त्यांना नगराध्यक्षपदी बसविले. त्या सातारकरांची आणि खासदार उदयनराजेंची त्यांनी घोर निराशा केली आहे अशी टीका केली.
उदयनराजेंच्या पराभवात तुमचा माेलाचा वाटा
दरम्यान याबाबत नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयाला जास्त महत्त्व देण्याची गरज वाटत नाही असे सांगितले. त्या म्हणाल्या, वेळ आल्यावर उत्तर देईन आणि संबंधितांचा व्याजासह हिशोब करीन असेही स्पष्ट केले.
मुलीने आईला हाक मारताच अपहरणकर्त्यांनी मंगळवार पेठेतून काढला पळ