

Students boarding the alternate bus arranged by Mahabaleshwar ST depot after prompt assistance.
Sakal
-संदीप गाडवे
केळघर: धाराशिव जिल्ह्यातील भूम आगाराची बस विद्यार्थ्यांना घेऊन महाबळेश्वर दर्शनासाठी दोन दिवसांपूर्वी आली होती. क्षेत्र महाबळेश्वर परिसरात ही सहलीची बस अचानक बंद पडली. चालकाने प्रयत्न करूनही बस सुरू होत नव्हती. घटनेची माहिती महाबळेश्वर आगाराचे आगार व्यवस्थापक महेश जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आपल्या आगाराची बस उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली.