

Mahabaleshwar: Forest officials and villagers from 105 villages discuss joint measures to prevent human-wildlife conflict.
Sakal
महाबळेश्वर: बिबट्या, रानडुकरे, रानगवा आदी प्राण्यांचा लोकवस्ती वावर वाढला असून, मानवी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला, तर शेकडो जनावरांचा फडशा पाडला आहे. भविष्यात वन्यजीव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांतील लोकांनी वनअधिकारी यांच्या समवेत बहुचर्चित बैठकीत केली.