Kelghar Ghat Landslide
Sakal
केळघर : महाबळेश्वर - सातारा - धामणेर-विटा या राज्यमार्गावरील केळघर घाटातील काळाकडा येथे काल ( सोमवार ) सायंकाळी पडलेली दरड हटविण्यास व त्यामध्ये अडकलेला जेसीबी बाहेर काढण्यास प्रशासनाला आज (मंगळवार ) दुपारी १२ : ३० वाजता यश आले असले तरी यापरिसरात अद्याप भूस्खलन होण्याचा धोका आहे . त्यामुळे बांधकाम विभागाने हा रस्ता सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . वाहनचालकांनी मेढा - मालदेव मंदिर - मार्ली - भिलार - मार्गे महाबळेश्वर तसेच मेढा - कुसुंबी - सह्याद्री नगर - मोळेश्वर - माचुतर या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिनेश पवार यांनी केले आहे.