ठाकरे कुटुंबियांच्या आवडत्या हाॅलिडे डेस्टिनेंशनला मिळाला "ब' वर्ग दर्जा

अभिजीत खूरासणे
Tuesday, 29 September 2020

या पर्यटनस्थळाचे राज्यस्तरीय महत्त्व, मोठ्या प्रमाणात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व इ. बाबी विचारात घेता, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने विशेष बाब म्हणून नगरपालिका क्षेत्रास "ब'वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली आहे. 
 

महाबळेश्वर : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्‍वरला राज्य शासनाने नुकताच नगरपालिका क्षेत्रास विशेष बाब म्हणून "ब' वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता दिली आहे. शहराला पर्यटनस्थळ वर्गवारीमध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरास पर्यटनस्थळाच्या वर्गवारीचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न केले.

सन 2018 मध्ये शासनास याबाबतचा प्रस्ताव पाठवून सलग दोन वर्षे पाठपुरावा केला. महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेकडून 13 जुलै 2019 रोजी "ब'वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला. राज्य शासनाची मंजुरी मिळण्यासाठी निकषांची पूर्तता करण्यात आली व प्रस्तावाच्या मान्यतेसाठी नगराध्यक्षा शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे फेब्रुवारी महिन्यात कुटुंबासमवेत महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यानिमित्त आले होते. त्यांनी येथील राजभवनातील दरबार हॉल येथे बैठक घेतली.

पोटात वाढवलेलं बाळ मला कोरोनाशी झुंजायला बळ देत होतं!

या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाबळेश्वर पर्यटनस्थळाची देशात वेगळी ओळख असावी, असे सांगून शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्तावित कामांची माहिती घेतली. पर्यावरणास हात न लावता पर्यटनवाढीस प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त करून वेण्णालेक सुशोभीकरण प्रस्तावाचे सादरीकरण केले होते. याच बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांना महाबळेश्वर पालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रेझेंटेशन दिले होते. महाबळेश्वर नगरपालिका क्षेत्रास "ब'वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबाबत शिफारस केली. महाबळेश्वरला विशेष बाब म्हणून "ब'वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जाबाबत कार्यवाहीचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. मार्चमध्ये झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महाबळेश्वर, पाचगणीच्या विकासासाठी तब्बल शंभर कोटी रुपयांची भरीव तरतूदही करण्यात आली होती.

मुलीच्या नावाने उघडा खाते, ती 21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख
 
याबाबत महाबळेश्वर नगरपालिकेस साेमवारी (ता.28) प्राप्त झालेल्या शासन निर्णयात महाबळेश्वर नगरपालिका क्षेत्रातील पर्यटनस्थळांना दरवर्षी साधारणत: 17 ते 18 लाख देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. या पर्यटनस्थळाचे राज्यस्तरीय महत्त्व, मोठ्या प्रमाणात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व इ. बाबी विचारात घेता, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने विशेष बाब म्हणून नगरपालिका क्षेत्रास "ब'वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली आहे. 

एकतीस हजारांपैकी साडेपाच हजार रुग्णांना मिळाला जनआरोग्यचा लाभ

महाबळेश्वरच्या प्रथम नागरिक म्हणून मी माझे सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी, पालिका कर्मचारी व महाबळेश्वरवासीयांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तालुक्‍याचे सुपुत्र एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आभार मानते. 
- स्वप्नाली शिंदे, नगराध्यक्षा 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahabaleshwar Municipal Area B Class Tourist Destination Satara News