

Heavy Rain in Mahabaleshwar Tapola Road Cave In Disconnects More Than 105 Villages From Main Town
sakal
महाबळेश्वर: मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर शहरालगत फळणे वस्ती येथे तापोळा मुख्य रस्ता पूर्णपणे खचल्याने तापोळा खोऱ्यातील १०५ हून अधिक दुर्गम व अतिदुर्गम गावांचा महाबळेश्वरशी संपर्क तुटला आहे. नगरपालिका हद्दीतील दळणवळणासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, तापोळा भागाला महाबळेश्वरशी जोडणारा सध्या हा एकमेव मार्ग आहे. सर्व बाजूंनी घनदाट जंगल असल्याने या रस्त्याला कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.